Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

शेतकऱ्यांनो, भाजपवाल्यांना दारातही उभे करू नका – शरद पवार यांचा घणाघात

Share

नगर | प्रतिनिधी 

अर्ज माघारीनंतर आगामी विधासभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरले आहेत. आज नगर जिल्ह्यातील पारनेर येथे त्यांनी सभा घेत भाजपचा समाचार घेतला.

पवार म्हणाले, आताच्या सरकारने अनेक विमा कंपन्या काढून सुद्धा शेतकऱ्यांना भरपाई मात्र मिळत नाही त्यामुळं सत्तेत आल्यानंतर अशा विमा कंपन्यांना धडा शिकवावा लागणार आहे.  पक्षातून अनेकजण सोडून गेले, ते गेले त्यांची चिंता वाटण्याचे कारण नाही उलट अशा दुटप्पी लोकांपासून आपली सुटका झाली आहे.

भाजपवर निशाणा साधत पवार यांनी सरकारने शेतकरी आणि उद्योगांचे मोठे नुकसान केले, सरकारच्या धोरणामुळं कारखाने बंद पडले, लोकांचे रोजगार गेले त्यामुळे शेतकऱ्यांनो मतदानासाठी भाजपला दारात सुद्धा उभं करू नका असे आवाहनाच पवार यांनी जनतेला केले. 

अहमदनगर: भाजप सरकारला शेती आणि शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही. शेतकरी आत्महत्या होत आहेत क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आजही दुष्काळाच्या झळा सोसतोय. येथील युवकाला रोजगार नाही. मतदान करताना या गोष्टींचा विचार नक्की करण्याचे आवाहनदेखील याप्रसंगी पवार यांनी केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!