Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच सार्वमत

पारनेरात ‘सैराट’

Share

आंतरजातीय विवाह करणार्‍या मुलीला पतीसह पेटविले

अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरजातीय विवाह केल्याने मुलीसह जावयाला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा ‘सैराट’ची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे. यात मुलगी मोठ्या प्रमाणात भाजल्याने उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. ही घटना पारनेर तालुक्यातील निघोज येथे घडली.

पीडित तरुणाला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये मुलीच्या मामा आणि काकांचा समावेश आहे. मुलीचे वडील मात्र अद्याप फरार झाले आहेत.
पीडित मुलीचे नाव रुक्मिणी रणसिंग असे आहे, तर जावई असलेल्या मुलाचे नाव मंगेश रणसिंग असे आहे. या दोघांनी 6 महिन्यांपूर्वीच आंतरजातीय लग्न केले होते. मात्र, या लग्नाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. अखेर विरोध डावलून लग्न केल्याचा राग मनात धरुन मुलीच्या नातेवाईकांनी 1 मे रोजी मुलीच्या आणि जावयाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले. त्यानंतर पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, काल (5 मे रोजी) रात्री उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. जावई मुलाची प्रकृतीही गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!