Friday, May 3, 2024
Homeनगरपारनेर शहराच्या विकासासाठी हवा तेवढा निधी देतो

पारनेर शहराच्या विकासासाठी हवा तेवढा निधी देतो

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर नगर पंचायतीचे नूतन अध्यक्ष विजय औटी व उपाध्यक्षा सुरेखा भालेकर यांच्यासह सर्व नगरसेवकांनी नुकतीच उपमुख्यमंत्री ना. आजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. आ. निलेश लंके यांनी ही भेट घडवून आणली. यावेळी पारनेर शहराच्या विकासासाठी हवा तेवढा निधी देतो, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री पवार यांनी दिली.

- Advertisement -

नगर पंचायतीच्या निवडणुकीनंतर पारनेरमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झालेली होती. राष्ट्रवादीला सर्वाधिक 7 जागा मिळाल्या होत्या. कोणत्याही परिस्थितीत नगर पंचायतीची सत्ता ताब्यात घेण्याचा चंग बांधलेल्या आ. लंके यांच्यासोबत शहर विकास आघाडीने जाण्याचा निर्णय निकालानंतर घेतला. पुढे अपक्ष नगरसेवक योगेश मते यांनीही विकासाच्या मुद्यावर राष्ट्रवादीची वाट धरली. शहर विकास आघाडीसोबत असलेले भाजपाचे नगरसेवक अशोक चेडे यांनीही विकास हाच अजेंडा डोळयासमोर ठेवत राष्ट्रवादीला साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोनच दिवसांत राष्ट्रवादीचे संख्याबळ 11 जागांवर जाऊन पोहचले होते.

त्यानंतर पद ग्रहणानंतर शहर विकासाचा ध्यास घेतलेल्या आ. लंके यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच नगरसेवकांना मुंबई येथे घेऊन जात उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घडवून आणली. पवारांनी सर्व पदाधिकार्‍यांचे स्वागत करीत आ. नीलेशने गड जिंकला असल्याच्या भावना व्यक्त केल्या. आता शहराचा विकास करण्याचे ध्येय बाळगा, हवा तेवढा निधी देण्याची ग्वाही दिली. मतदारसंघात जसे काम करतोय तसेच शहरातही काम करा. तुम्हाला नागरिक डोक्यावर घेतील,असा सल्लाही पवार यांनी यावेळी दिला.

यावेळी आ. नीलेश लंके यांच्यासह नगराध्यक्ष औटी, उपनगराध्यक्षा भालेकर, अर्जुन भालेकर, नंदू औटी, नगरसेवक अशोक चेडे, नितीन अडसूळ, डॉ. विद्या कावरे, योगेश मते, भूषण शेलार, प्रियंका सचिन औटी, कुमारी हिमानी नगरे, निता विजय औटी, सुभाष शिंदे यांच्यासह प्रमोद पवार, संतोष औटी मेजर, विशाल कावरे, पुष्काराज बोरूडे, अनिल औटी, दिनेश औटी, प्रशांत जाधव, अजिंक्य देशमुख, अक्षय औटी, प्रदीप औटी, गणेश औटी, बजरंग औटी, अमोल औटी, गणेश औटी, रोहन नगरे आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या