पारनेर : जामगावमध्ये मळगंगा माता सप्ताह व कलशारोहन सोहळा

0

महामंडलेश्‍वर गिरीजी महाराज यांच्या हस्ते
बुधवार (दि.29) रोजी कलशारोहन

पारनेर  – तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जामगाव येथील मळगंगा देवी अखंड हरिनाम सप्ताहास आज शुक्रवार (दि.24) पासून सुरूवात होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या 1 कोटी 11 लाख रूपये लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या मंदीराचा कलशारोहन बुधवार (दि.29) रोजी महामंडलेश्‍वर गिरीजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे.

ऐतिहासीक जामगाव नगरीत नवसाला पावणारी मळगंगा माता अशी ख्याती असलेल्या देवी मंदिराच्या प्रांगणात 18 व्या सप्ताहास सुरूवात होणार आहे. यावर्षी नवीन मंदिराचे काम पूर्णत्वास गेले आहे. शुक्रवार (दि.1 डिसेंबर) रोजीपर्यंत चालणार्‍या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहे.

सायंकाळी 7 ते 9 या वेळेत दैनंदिन पहिल्या दिवशी बालकिर्तनकार मुकेश महाराज घावटे व रामदास महाराज कोतकर यांची जुगलबंदी किर्तन रंगणार आहे. मनिषा महाराज मोटे (शहांजापूर), कोळी काकी (वांबोरी), यशवंत महाराज थोरात (ढवळपुरी), भरत महाराज थोरात (खेड), महामंडलेश्‍वर गिरीजी महाराज (वेरूळ), राम महाराज डोंगरे आदींचे किर्तने होणार आहे. शुक्रवारी (दि.1) रोजी काल्याचे किर्तन डॉ. विकासनंद महाराज मिसाळ यांचे होणार आहे. किसन भुजबळ यांनी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

सात दिवस चालणार्‍या सप्ताहाचा व कलशारोहन सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मळगंगा माता मंदिर जिर्णोध्दार व सप्ताह समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*