पारनेर : राजनंदीनी शिंदे हिचे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत यश

0

पारनेर – तालुक्यातील भाळवणी येथील आयझॅक इंग्लिश मेडियम स्कूलची इयत्ता 2 रीची विद्यार्थीनी राजनंदीनी मनोज शिंदे हिने राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेत जिल्हास्तरावर यश मिळविले. तिने 10 हजार विद्यार्थ्यांमधून 4 था क्रमांक मिळविला.

जामगाव येथील रहिवासी असलेले आदर्श शेतकरी मनोज शिंदे यांची ती मुलगी आहे. राजनंदीनी हिचा राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेत तालुकास्तरावर 900 विद्यार्थ्यांमधून 2 रा क्रमांक मिळवून जिल्हास्तरावर निवड झाली होती.

नुकत्याच जिल्हास्तरीय बालचित्रकला स्पर्धा संपन्न झाल्या. यास्पर्धेत राजनंदीनी हिने उत्कृष्ट चित्र काढून गट 2 मध्ये 4 था क्रमांक मिळविला.

माध्यमिक शिक्षण विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी श्री.पोल्हे, श्रीमती ठुबे यांच्या हस्ते राजनंदीनीचा सन्मान करण्यात आला.

 

तिला आयझॅक इंग्लिश मेडियम स्कूलचे चित्रकला शिक्षक कदम व सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल तिचे पंचायत समिती सदस्या सुनंदा धुरपते, उद्योजक सुरेश धुरपते, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माळी, जामगावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशोक मेहेर, सरपंच दिनकर सोबले, उपसरपंच सुनीता शिंदे यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

*