पारनेर : चंपाषष्ठीनिमित्त कोरठण खंडोबा देवस्थानात पालकमंत्री शिंदेंच्या हस्ते पूजा

0

पारनेर : महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पारनेर तालुक्यातील कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा येथे आज सकाळी 10 वाजता चंपाषष्ठी महोत्सवानिमित्त भेट दिली.

पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते खंडोबा देवाची विधिवत पूजा झाली व आरती करण्यात आली. पालकमंत्र्यांनी देवस्थानाच्या मंत्रालयात सादर केलेल्या सुमारे 2 कोटी रुपयांच्या आराखड्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर मंजुरी देण्याचे सर्व भक्तांना आश्वासन दिले. तसेच निसर्गरम्य असलेल्या या देवस्थानच्या विकासात सरकार कधीही कमी पडणार नसून महत्वाच्या आशा सर्व पायाभूत सुविधा या देवस्थानाला देण्यात येतील असे सांगितले व देवस्थान विश्वस्त मंडळ व ग्रामपंचायतने दिलेल्या सर्व विकासविषयक निवेदनाची दखल घेऊन पूर्तता करण्यात येईल असे सांगितले.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष विश्वनाथ कोरडे, महिला तालुका अध्यक्ष व विश्वस्त अश्विनी थोरात, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष व विश्वस्त चंद्रभान ठुबे, वसंत चेडे, बाळासाहेब नरसाळे, सुनील थोरात, सरपंच अशोक घुले, उपसरपंच बाळासाहेब पुंडे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप जगताप, स्मिता घोडके, मिजास हवालदार, रतन वाळुंज, गोपीनाथ घुले, देवस्थानचे अध्यक्ष ऍड.पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, सचिव महेंद्र नरड, सहसचिव मनीषा जगदाळे, विश्वस्त मोहनदादा घनदाट, किसन धुमाळ, खजिनदार हनुमंत सुपेकर, किसन मुंढे, दिलीप घोडके आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*