Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशकृषी कायदे लोकसभेत रद्द, राकेश टिकैत म्हणतात...

कृषी कायदे लोकसभेत रद्द, राकेश टिकैत म्हणतात…

दिल्ली l Delhi

आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत तीनही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भातील विधेयक सादर करण्यात आलं.

- Advertisement -

तीनही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी कायदे मागे घेण्याचं विधेयक पटलावर सादर करताच विरोधकांनी मोठा गोंधळ केला. ​त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

दरम्यान कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आल्यानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आंदोलन सुरूच राहणार असल्याचं म्हटलं आहे. राकेश टिकैत यांनी म्हंटल आहे की, ‘शेतकरी आंदोलनात प्राण गमावलेल्या सर्व ७५० शेतकर्‍यांना ही श्रद्धांजली आहे. MSP सह इतर प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने आंदोलन सुरूच राहील.’

- Advertisment -

ताज्या बातम्या