संसदेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये!

0

संसदेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये घेणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी दिली आहे.

यूपीए सरकारच्याकाळातही अनेकदा संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखा पुढे मागे करण्यात आल्या होत्या असेही ते म्हणाले.

यूपीएच्या काळातही हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये घेण्याचा प्रकार 2008 व 2013 मध्ये झाला होता. भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचा परिणाम संसदेच्या अधिवेशनावर होतो. याआधीच्या सरकारनेही अधिवेशन घ्यायला विलंब केला होता. विधानसभा निवडणूक व अधिवेशन एकाच काळात येऊ नये यासाठी काळजी ही घेतली जात असते, पण असे काँग्रेसच्या काळातही झाले आहे त्यामुळे भाजपा संसदेच्या हिवाळी अधिवेशनास  मुद्दाम विलंब करीत असल्याच्या आरोपत तथ्य नाही, असंही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

*