पालकच गणवेश खरेदी करणार

0

बील, खाते क्रमांक दिल्यानंतर रक्कम

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आता स्वत: गणवेश खरेदी करावा लागणार असून खरेदी पावती व खाते क्रमांक देऊन सदर रक्कम मिळणार आहे.
यापूर्वी गणवेश खरेदी शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून केली जात होती.
आता मात्र, विद्यार्थ्यांना स्वत:च्या आवडीनुसार चांगल्या प्रतीचा गणवेश खरेदी करता येणार आहे. इयत्ता 1 ली ते 8 वीपर्यंतच्या सर्व मुली व अनुसूचित जाती-जमाती व दारिद्य्ररेषेखालील मुलांना गणवेश खरेदी केल्यावर रक्कम मिळणार आहे.
यासाठी 7 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एका गणवेशासाठी दोनशे रुपये मिळणार असून प्रत्येकी दोन गणवेश खरेदी करायचे आहेत. खरेदी झाल्यावर त्याचे बील व बँक खाते क्रमांक दिल्यावर दोन गणवेशाचे चारशे रुपये मिळणार आहेत.

गैरव्यवहाराला बसला चाप गैरव्यवहाराला बसला चाप गणवेश खरेदीमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याच्या यापूर्वी घटना घडल्या आहेत. यावरून शालेय व्यवस्थापन समितीमध्येच दोन गट पडायचे. समिती सदस्य व काही शाळांतील मुख्याध्यापक शिक्षक संगनमताने दरवर्षी ठराविक व्यावसायिकाकडून गणवेशाची कमी दरात खरेदी करण्याचा प्रयत्न करायचे.मात्र, जागृत पालक त्यांचा प्रयत्न हाणून पाडायचे.तर, एखाद्या ठिकाणी सदर प्रकार लक्षात न आल्याने यामध्ये गैरव्यवहार करण्यास वाव मिळायचा. मात्र,आता विद्यार्थी व पालकच थेट खरेदी करणार असल्याने गैरव्यवहाराला चाप बसणार हे निश्‍चित.

LEAVE A REPLY

*