Friday, April 26, 2024
Homeनाशिकपाल्य, पालक आणि लॉकडाऊन

पाल्य, पालक आणि लॉकडाऊन

नाशिक | प्रतिनिधी

कोरोनाने जगातील अनेक देशांमध्ये थैमान घातले आहे. लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे.अशा स्थितीत सर्वत्र लाॅकडाऊन सुरू असताना घरात वेळ कसा घालवायचा ही समस्या अनेकां समोर दिसते त्यासाठी काही गोष्टी केल्या तर आपला वेळ चांगला जाईल.

- Advertisement -
  • सकारात्मक रहा:-कोरोनो या आजारापासून काही लोक बरे झालेले सुध्दा दिसून आले आहे.म्हणून सकारात्मक राहणे गरजेचे आहे.
  • वेळेचा सदुपयोग करा:-वेळेअभावी काही गोष्टी करावयाच्या राहुन गेल्या असतील तर तुम्ही त्या गोष्टींना या काळात वेळ देऊ शकतात.
  • घरबसल्या अवांतर वाचन किंवा लेखन करावे:-घरात बसून नसत्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा चांगली पुस्तके वाचावी.
  • मुलांबरोबर वेळ घालवावा:-आजकालच्या धावपळीच्या युगात पती-पत्नी दोघेही नोकरी करतात.त्यामुळे आॅफिस मधील जबाबदाऱ्या यामुळे मुलांना कुठेतरी वेळ कमी पडतो.त्यामुळे या काळात आपण मुलांबरोबर गप्पा मारणे,त्यांना वेळ देणे, त्यांच्याबरोबर खेळणे,त्यांचा अभ्यास घेणे या गोष्टी देखील करू शकता.
  • मोटिवेशनल व्हिडिओ पाहावे:-या काळात आणि नेहमीच आपल्याला मोटिवेशनल व्हिडिओ काहीतरी सकारात्मक प्रेरणा देत असतात.म्हणून तसे व्हिडिओ पाहावेत व मुलांनाही ते दाखवावेत.
  • मनोरंजन, खेळ, गाणी ऐकावीत:-टीव्ही वर अनेक चांगले कार्यक्रम असतात. ते बघतांना मनोरंजनाबरोबर आपले ज्ञानदेखील वाढते. क्वीझटाईम, करोडपती, डिस्कव्हरी असे किती तरी चांगले कार्यक्रम असतात. अंतराळातील दृश्ये, भौगोलिक, वैज्ञानिक, आरोग्यविषयक, सौंदर्यविषयक माहिती देणारे अनेक कार्यक्रम बघितले तर माणसाला यापासून खूप फायदा होतो.आपल्या ज्ञानकक्षा वाढतात. त्या गोष्टी जर लहान मुला-मुलींना दाखविल्यातर ती माहिती खूप उपयोगी पडते. म्हणून पालकांनी अशा गोष्टी आपल्या पाल्यांना बघण्यास सांगणे जरूरीचे आहे. यामुळे ज्ञानात भरही पडेल व वेळ कसा घालवायचा हा प्रश्न येणार नाही.
  • योग्य व्यायाम, ध्यानधारणा करावी:-समर्थ रामदासांनी कित्येक वर्षांपूर्वी बलोपासना करण्याकरिता अनेक व्यायामशाळांची निर्मिती केली. स्वामी विवेकानंदांनी आपल्या अनेक पुस्तकात व्यायाम, शरीर सौष्टयाचे महत्त्व सुचित केलेले दिसते.
    जसा मुलांनी दररोज अभ्यास करणे जितके जरूरीचे आहे. तितकेच व्यायाम करणे देखील जरूरीचे आहे. व्यायाम केल्याचे अनेक फायदे आहेत, हे आपण जाणतोच. व्यायाम करून शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

काही सहज सोप्या गोष्टी ज्या तुमच्या पाल्यांना पाळावयास सांगा

  • ऐतिहासिक, पौराणिक, विनोदी, धाडसी,शौर्यकथा अशा साहित्याचे वाचन करा.
  • रोज नियमित व्यायाम करणे.
  • सतत २४ तास कोरोनाशी संबंधित बातम्यांचा भडिमारापासून दूर रहा.
  • अफवांपासून दूर रहा, वास्तव जाणून घ्या.
  • योग्य ती काळजी घेतली तर हा आजार होत नाही, असा विवेकी विचार करा.गर्दी टाळा,कोरोना टाळा, प्रशासनाला सहकार्य करा #StayHome, #StaySafe

प्रा.सारिका क्षीरसागर, (के.टी.एच.एम.महाविद्यालय, शिवाजी नगर, गंगापूर रोड,नाशिक-०२)
(मानसशास्त्र विभाग)

- Advertisment -

ताज्या बातम्या