आत्मनिर्भर भारत : निमलष्करी दलाच्या कँटीनमध्ये आजपासून विदेशी उत्पादनांवर बंदी

jalgaon-digital
1 Min Read

सार्वमत

नवी दिल्ली – भारतीय निमलष्करी दलाने आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात सुरक्षादलाने एक हजार विदेशी उत्पादनांच्या वापरावर बंदी घातली आहे.
केंद्रीय पोलीस कल्याणद्वारे चालविल्या जाणार्‍या सीडीएस कँटीनमध्ये आता फक्त स्वदेशी साहित्य मिळेल.

निमलष्करी दलातील सीआरपीएफ, बीएसएफ, आईटीबीपी, सीआयएसएफ, सीमा सुरक्षा बल, एनएसजी, असम रायफल्सचे 10 लाख जवान आणि त्यांचे 50 लाख कुटुंबिय कँटीनमधील उत्पादनाचा लाभ घेतात. आता या सर्वांना स्वदेशी वस्तू खरेदी कराव्या लागणार आहेत.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात आत्मनिर्भर भारतचा नारा दिला होता. यावेळी त्यांनी स्थानिक उत्पादनांसाठी आग्रही व्हा, असे सांगितले होते. आपल्या देशातील नागरिक लोकलसाठी व्होकल झाले तर ही उत्पादने आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारुपाला येतील. याशिवाय, देशांतर्गत बाजारपेठेलाही चालना मिळेल, असे मोदींनी म्हटले होते.

यावर बंदी
यात कपडे, इलेक्ट्रॉनिक उत्पादन, टूथ पेस्ट, शाम्पू, बॅग, हॉर्लिक्स, हॅवल्सचे उत्पादन, फूटवेअर, स्केचर, रेड बुल ड्रिंक, माइक्रोवेव्ह, यावर बंदी घालण्यात आला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *