राष्ट्रवादीत जाण्यासाठी तुम्ही किती कोटी घेतले? : पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर पलटवार

0
बीड – जिल्हा परिषदेच्या पाच सदस्यांच्या बदल्यात सुरेश धस यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून 15 कोटी रुपये घेतल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी बंधू धनंजय यांच्यावर पलटवार केला आहे.
ज्या चुलत्याने (दिवंगत गोपीनाथ मुंडे) राजकारणात आणले, अनेक पदे दिली, आमदारकी दिली, सत्ता असती तर मंत्रीही केले असते, त्यांच्याशी गद्दारी करून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी धनंजयराव तुम्ही राष्ट्रवादीवाल्यांकडून किती कोटी रुपये घेतले होते असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे.
सोमवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये होते. त्यावेळी अजित पवारांनी व धनंजय मुंडेंनी सुरेश धस यांच्यावर सडकून टीका केली. तसेच पंकजा मुंडेंकडून धस यांनी 15 कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. यानंतर मागील 24 तासांत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.
पंकजा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनी 15 कोटी रुपये घेतल्याचे केलेले वक्तव्य ऐकून मला काहीच आश्चर्य वाटले नाही. यापूर्वीही धनंजय यांनी असे बालिश आणि हास्यास्पद आरोप माझ्यावरच नव्हे तर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यावर केले आहेत. त्यामुळे कालचे वक्तव्य त्या बालिशपणातूनच आले आहे. धनंजय मुंडे यांनी मुंडे साहेबांच्या जन्म तारखेबाबत अशीच चुकीची माहिती अजित पवारांना दिली होती.
शरद पवारांच्या जाहीर सभेतही मुंडे साहेबांना मीच एक लाख बोगस मतदान करून विजयी केल्याचे सांगितले होते. बोगस मतदान करणे व करवून घेणे हा गुन्हा असतो हे माहीत नसण्याइतपत धनजंय अपरिपक्व आहेत हे सिद्ध केले आहे. धनजंय मुडेंना भाजपमध्ये सर्व काही दिले होते, तरीही ते राष्ट्रवादीत गेले. मग धसयांना पैसे देऊन खरेदी केले म्हणणार्‍या धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत जाताना किती कोटी रुपये घेतले होते, असे मला त्यांना विचारायचे आहे, असे पंकजा म्हणाल्या.

 

LEAVE A REPLY

*