Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : नांदगावमधून शिवसेनेचे सुहास कांदे आघाडीवर, पूर्वमधून राहुल ढिकले आघाडीवर

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकपूर्व मध्ये प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या लढतीत पोस्टल मतदानात भाजपचे राहुल ढिकले आघाडीवर आहेत. तर नांदगावमध्ये छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ आघाडीवर होते मात्र आता ते पिछाडीवर गेले असून याठिकाणी सुहास कांदे जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांनी आघाडी घेतली आहे.

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे सुपुत्र म्हणून पंकज भुजबळ यांची याच मतदारसंघातून ओळख निर्माण झाली आहे.

२००९च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे आमदार संजय पवार यांचा तर २०१४ च्या निवडणुकीत सध्या जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पद भूषवित असलेल्या सुहास कांदे व अद्वय हीरे यांना पराभवाची धूळ चारत सलग दोन वेळा निवडून येण्याचा विक्रम रचला होता. आता मात्र भुजबळ पिछाडीवर असल्याने याठिकाणी धक्का बसण्याची शक्यता आहे.

तर पूर्वमध्ये विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना भाजपने तिकीट डावलले. त्याच्या जागी मनसेनेतून भाजपमध्ये आलेल्या राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली. सानप यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादीच्या तिकिटावर उमेदवारी लढवली आहे. त्यामुळे सानप यांच्यासाठी आणि भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढाई झाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!