Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सेल्फी

लाकडी डब्बे, कोळशाच्या भाप इंजिनावर चालायची ‘ही’ रेल्वे; आज ‘ती’चा १०७ वा वर्धापन दिन

Share

देशदूत डिजिटल विशेष

तुम्हाला माहिती नसेल की आज हजारो प्रवाशांची वाहतूक करणारी पंजाब मेल ही रेल्वे सर्वात जुनी रेल्वे म्हणून ओळखली जाते. आज या रेल्वेला १०७ वर्षे पूर्ण झाली आहेत. १९१२ साली ही रेल्वे पहिल्यांदा पटरीवर धावली. त्याकाळात ही रेल्वे ‘भाप इंजिन’ म्हणजे वाफेच्या इंजिनावर धावत असे.

ही गाडी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (आधीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस) ते फिरोजपुर (पंजाब) इथपर्यंत प्रवास करते.  पंजाब मेल’ची सुरुवात 1 जून 1912 साली झाली.

ही गाडी बल्लार्ड पियर पासून पुढे पेशावर पर्यंत जायची. पंजाब मेलची सुरुवातिच्या तारखेचा संदर्भ मध्य रेल्वेच्या एका जुन्या दस्तावेजानुसार केल्याची माहिती आहे.

ही गाडी खासकरून ब्रिटिश अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या परिवारांना मुंबई ते दिल्ली आणि पुढे ब्रिटिश भारताच्या उत्तर पश्चिम सीमांत प्रांतापर्यंत घेऊन जाण्यात मदत करत असे.

समुद्री मार्गे येणारे इंग्रज अधिकारी जहाजातून उतरताच रेल्वेत बसून आपल्या ड्युटीच्या ठिकाणी पोहोचत असत. १९१२ नंतर दोन वर्षांनी म्हणजेच 1914 मध्ये मुंबईच्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून विक्टोरिया टर्मिनस करण्यात आले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या रेल्वेचे अखेरचे ठिकाण पाकिस्तान सीमेवरील फिरोजपुर स्टेशन करण्यात आले होते.

१०७ वर्षाची सोबती

२०१२ मध्ये या रेल्वेला १०० वर्षे पूर्ण झाली.  स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पंजाब मेल रेल्वेची राणी म्हणून गौरविण्यात आली. ही पहिलीच गाडी जिने १०० वर्षे पूर्ण केली आहेत. तर आजची पंजाब मेल काळानुरूप बदलली असून इलैक्ट्रिक इंजिन आणि स्लीपर क्लास बोगीद्वारे धावते. जुनी पंजाब मेल कोळशाद्वारे भापच्या इंजिनाने चालत असे. विशेष म्हणजे लाकडी डब्बे या गाडीला होते. या गाडीला सुरुवातीला ‘पंजाब लिमिटेड’च्या नावाने ओळखले जाई.

स्वातंत्र्यपूर्व कालखंडात ही गाडी इटारसी, आगरा, दिल्ली, अमृतसर, लाहौर आणि पेशावर मधील 2496 किलोमीटरचे अंतर कापत असे. सुरुवातीला ही गाडी गोर्यां इंग्रजांसाठी चालविण्यात आली. त्यानंतर  1930 मध्ये सर्वसामान्यांसाठी ह्या गाडीत थर्ड क्लास (सध्याचा क्लास थ्री) बोगी जोडण्यात येऊ लागले.

स्वातंत्र्यच्या दोन वर्ष आधी म्हणजेच १९४५ मध्ये पहिल्यांदाच या गाडीला वातानुकूलित बोगी जोडण्यात आल्या. १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही रेल्वे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून पंजाबमधील फिरोजपुर इथपर्यंत आजतागायत सुरु आहे.

या गाडीला 24 बोगी आहेत. यामध्ये ए.सी. सोबतच सर्वसामान्य आणि स्लीपर क्लासच्या बोगीदेखील आहेत. सध्या ही गाडी १९३० किमीचे अंतर पार करते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!