पांगरमल प्रकरणात पोलीस रडारवर

0

आरोपीच्या संपर्कत राहिल्याने उत्पादन शुल्कचे रुपेश चव्हाण निलंबित

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील पांगरमल येथे बनावट मद्य प्रशान केल्यामुळे 9 जणांची बळी गेला होता. त्यातील मुख्य आरोपी जाकीर शेख याच्या सानिध्यात राहिल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क शाखेचे दुय्यम निबंधक रुपेश चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई डॉ. आश्‍विनी जोशी (आयुक्त राज्य उत्पादनशुल्क मुबई) यांनी केली आहे. या घटनेत अणखी एकाचे निलंबन झाल्याची माहिती सुत्रांनी दिली असून याबाबत माहिती देण्यात उत्पादन शुल्क शाखेच्या अधिकार्‍यांनी टाळाटाळ केली. या घटनेत पोलीस कर्मचारी देखील आरोपींच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे पोलीस खात्यातील अधिकारी व कर्मचारी देखील रडारवर असल्याचे बोलले जात आहेत.
नगर तालुक्यातील पांगरमल येथे जिल्हा रुग्णालयातून बनावट दारुचा पुरवठा केला जात होता. त्याच बरोबर नगर तालुक्यातील बाभूळगाव, दरेवाडी, नेवासा अशा ठिकाणी देखील हे मद्य वितरीत केले जात होते. ही घटना उघड झाल्यानंतर पोलीस उपअधिक्षक आनंद भोईटे यांनी मुख्य आरोपी जाकीर शेख, जितू गंभीर, सोनु दुग्गल व मोहन दुग्गल अशा 17 जणांना अटक केली होती.
या दरम्यान आरोपी जाकीर शेख हा आरोपी असून देखील त्याच्यासोबत पोलिसांचे, जिल्हा रुग्णालयातील, कर्मचारी व अधिकार्‍यांचे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांचे अर्थपुर्ण संबंध असल्याचे बोलले जात होते. यावर माध्यमांनी प्रकाश टाकला होता. याची दाखल घेत राज्य उत्पादनशुल्क आयुक्त मुबई यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
या चौकशीचा अवाल डॉ. जोशी यांना प्राप्त झाला असता त्यांनी रूपेश चव्हाण यांना तत्काळ निलंबित केले आहे. चव्हाण यांचे 32 वेळा मोबाईल संपर्क झाला असून 16 वेळा संभाषण झाल्याचे म्हटले आहे. याबाबत चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यात समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

चार विभाग कारवाईच्या रडारवर –
या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांचे देखील आरोपींशी हितसंबंध असल्याचे उघड झाले होते. मात्र त्यांची चौकशी पडद्याआड झाली. तोफखाना व एलसीबीच्या कर्मचार्‍यांच्या केवळ मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या. तर त्यांना पुन्हा पोलीस ठाणे देखील देण्यात आले. मात्र ज्यांची काही एक चुक नव्हती त्यांच्यावर निलंबनाची कुर्हाड कोसळली आहे. शेकडो कॉल असणार्‍यांना पोलीस अधिकार्‍यांनी पाठीशी का घातले या अर्थपुर्ण तडजोडी सर्वश्रुत आहेत. मात्र ही चौकशी मुंबई विभागाकडून सुरू असून पोलीस अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क, लाचलुचपत विभाग व रुग्णालयातील कर्मचारी हे रडारवर आहेत.

दारुकांडातील बळी –
पोलीस खात्यात ज्यांच्या चुका होत्या त्यांना पाठीशी घातले व निरापराध तीन पोलीस कर्मचारी व एका अधिकार्‍याचे निलंबन करण्यात आले होते. यात जिल्हा शल्यचिकित्सक यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तीन अधिकारी व सहा कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले आहेत. तसेच लाचलुचपत व पोलीस खात्यातील अधिक्षकांच्या बदल्या करुन त्यांना बाजुच्या शाखा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात चौकशीत अणखी काही व्यक्तींवर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

 

LEAVE A REPLY

*