‘पांगरमल’मुळे नगर तालुक्यात दारूपार्ट्यांची प्रथा बंद

0

28 ग्रामपंचायतींसाठी शनिवारी मतदान, अनेक ठिकाणी सामान्य सरपंचपदाच्या शर्यतीत 

अहमदनगर (प्रतिनिधी)– जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नगर तालुक्यात पांगरमल दारूकांड घडले होते. या दारूकांडामुळे जिल्हा नव्हे, संपूर्ण राज्य हादरले होते. आता नगर तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीसाठी शनिवारी मतदान होणार आहे.
मात्र, या निवडणुकीसाठी एकाही गावात रात्रीच्या दारूपार्ट्या जेवणावळी झाल्या नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या ज्या पांगरमलमुळे दारूकांड झाले घडले होते. त्या ठिकाणी 10 वर्षानंतर पहिल्यांदा बिनविरोध निवडणुकीला बे्रक लागला असून त्या ठिकाणी आव्हाड बंधूंमध्ये लढत होत आहे.
नगर तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी गेल्या आठ दिवस रणधुमाळी जोरात होती. याठिकाणी दिवसभर जोरदार प्रचार होताना दिसला. यातील बहुतांशी ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचे आ. शिवाजी कर्डिले यांच्या समर्थक गटामध्ये लढती होत आहेत.
यापूर्वी नगर तालुक्यातील गावागावातील प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात सामान्य निवडणुकीत उतरत नव्हते. मात्र, पहिल्यांदा थेट सरपंचाची निवड जनतेतून होणार असल्याने बहुतांशी ठिकाणी गावातील सामान्य कार्यकर्ते या निवडणुकीत आपले नशिब आजमावताना दिसत आहेत.
तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींपैकी पांगरमल, दहिगाव, उक्कडगाव, सोराळाबद्दी या प्रमुख ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहे. या निवडणुकीत जेवणावळ्या थांबल्या असल्याने उमेदवारांच्या खिशावरील ताण काहीसा कमी झाला आहे.

  तालुक्यात सर्वांना सुपरिचित असणार्‍या बाबुर्डी गावातील निवडणुक चांगलीच रंगतदार बनली आहे. याठिकाणी नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपाध्यक्ष रेवनाथ चोभे यांच्या विरोधात गावातील तीन पत्रकारांनी एकत्र येऊन पॅनल दिले आहे. यामुळे गावच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

*