Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पंढरीत

Share

पंढरपूर – वारकर्‍यांचा अपूर्व उत्साह, खांद्यावर भगव्या पताका, गळ्यात तुळशीमाळ, कपाळी बुक्का अन् जोडीला हरिनामाचा गजर आणि वरुणराजाची हजेरी अशा चैतन्यमय वातावरणात राज्याच्या कानाकोपर्‍यातून 10 लाख वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत.

संत तुकाराम महाराजांची पालखी तसेच संत ज्ञानेश्वरांचीही पालखी पंढरपुरात दाखल झाली. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीसमोर शेवटचे उभे रिंगण पार पडले. नगर जिल्ह्यासह राज्यभरातून पंढरीच्या दिशेनं निघालेले वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत. पांडुरंगाचं दर्शन व्हावं हीच सर्व वारकर्‍यांची इच्छा असते. त्यामुळे अवघी पंढरी वारकर्‍यांनी गजबजलेली पाहायला मिळत आहे. आषाढी सोहळ्यासाठी सर्वच पालखी सोहळे अखेरच्या टप्प्यात पोहोचले आहेत. मात्र विठुरायाच्या दर्शनाची रांग तब्बल 7 किलोमीटर अंतरावर पोहचली असून भाविकांना देवाच्या पायाजवळ पोहचायला 30 तासांचा अवधी लागणार आहे.

यंदा राज्यातील अनेक भागात समाधानकारक पावसाला सुरुवात झाल्याने आषाढीला विक्रमी गर्दीचा अंदाज व्यक्त होत आहे. विठ्ठल भक्तांची रांगल सात किमीवर पोहोचली आहे. महिनाभर विविध पालख्यात चालत आलेल्या भाविकांना दर्शनासाठी तासंतास रांगेत उभं राहायलाही काहीच वाटत नाही. फक्त विठुरायाच्या पायावर मस्तक ठेऊन दर्शन घेण्याची भावना लहान थोरांची दिसून येत आहे.पंढरपुरात काल पावसाचे आगमन झाल्याने भाविक सुखावला आहे. दर्शन रांगेत मंदिर प्रशासनाने 25 लाख लिटर मिनरल वॉटर वाटपास सुरुवात केली असून यंदाचा दर्शन मंडप वॉटरप्रूफ करण्यात आल्याने भाविकांना पावसाचा त्रास जाणवत नाही. दर्शन रांगेत यंदा दोन प्रकारची कार्पेट टाकल्याने भाविकांना पायाला त्रासही जाणवत नाही. दरम्यान, विठ्ठलाच्या शासकीय पुजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात दाखल झाले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!