यंदाच्या वारीत नाशिक सायकलिस्टतर्फे सायकलचे रंगणार रिंगण

0

नाशिक : नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनतर्फे सालाबाद याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त पंढरपुर सायकल वारीचे आयोजन करण्यात आले असून या सायकल वारीच्या नाव नोंदणी करीता नाशिक मधील सायकलप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आयपीएस अधिकारी हरीश बैजल यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या सायकल वारीच्या नोंदणीसाठी एक दिवसाची मुदत वाढवण्यात आली असून आता सायकल प्रेमींना सोमवार (१९ जून) पर्यंत नोंदणी करता येणार आहे.

वारीचे हे सहावे वर्ष असून या वारीमध्ये वैशिष्टय म्हणजे नाशिक सायकलीस्टचे ४ सायकलस्वार त्र्यंबकेश्वर शहरातील निवृत्तीनाथ अह्स्रामापासून नाशिक सायकलीस्टचा स्वज घेऊन निघणार आहेत.

त्यानंतर ते गोल्फ क्लब येथून सर्व वारकर्यांना घेऊन पुढे प्रस्थान करतील. त्याचप्रमाणे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सायकलचे रिंगण घालण्यात येणार असून असा प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे. पंढरपूर जवळच्या खेडलेकर महाराज आश्रमाच्या मैदानात हे सायकल रिंगण घालण्यात येणार आहे. हे सर्व क्षण अनुभवण्यासाठी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या सायकलीस्टमध्ये कुतुहुल निर्माण झाले आहे.

या पंढरपुर सायकल वारीसाठी ५०० हुन अधिक सायकलीस्ट सहभागी होतील अशी खात्री असून यावर्षी मागील वर्षीपेक्षा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. वारीच्या एक आठवडा आधी आतापर्यंत (१६ जून) ३०० नोंदणी झाल्या असून मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे. नाशिक सायकलीस्टसाठी अभिमानाची बाब म्हणजे आठ वर्षीय मोक्ष सोनावणे, तसेच नऊ वर्षांची ऋतू भामरे या सायकल वारीसाठी नोंदणी केली असून एकूण वारकऱ्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक महिलांचा समावेश आहे.

मुंबई येथील रवींद्र क्षीरसागर (एसीपी, मुंबई पोलीस), वाल्मिक पाटील (एसीपी, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक खाते), कन्हैय्या थोरात (एसीपी, ठाणे शहर), निलेश धोटे (ठाणे आरटीओ) यांच्यासोबतच नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्याचे पीआय मधुकर कड हे सुद्धा वारीमध्ये सहभागी होत आहेत. त्याचप्रमाणे यावर्षी सिन्नर येथून ४०, अहमदनगर येथून १०, पुणे, मुंबई सारख्या महानगरातूनही सायकलीस्ट वारीमध्ये सहभागी होणार असल्याने नाशिक आता सायकलिंग कॅपिटल बनण्याच्या वाटेकडे जलद गतीने जाताना दिसत आहे.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत नाशिक सायकलीस्टचे अध्यक्ष जसपाल सिंघ विर्दी यांनी ही माहिती दिली. यावेळी शैलेश राजहंस, योगेश शिंदे, श्रीकांत जोशी, नीता नारंग, सोफिया कापडिया, रत्नाकर आहेर, किशोर काळे आदी सदस्य उपस्थित होते.

नाशिक मधील शिवशक्ती सायकल्स, लुथरा एजन्सी (जुना गंगापूर नका, गंगापूर रोड), इंदिरानगर येथील भांड सायकल्स, स्माईल अँड ब्रेसेस डेंटल क्लिनिक (नाशिक रोड), ए टू झेड सायकल्स (जिल्हा परिषद भवन), डीकॅथलॉन (विल्लोळी) या ठिकाणी नाशिक सायकलीस्टतर्फे पंढरपुर सायकल वारीसाठी नावनोंदणी अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत.

सायकल वारी २०१७ मध्ये मागील्वार्शिपेक्षा अनेक सुविधा सुधारित स्वरुपात देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून संपूर्ण वारी दरम्यान दोन अँब्यूलन्स, ४ डॉक्टर्स आपत्कालीन परिस्थितीत सेवेसाठी सुसज्य असणार आहेत.

जास्तीत जास्त सायकल प्रेमींनी या पंढरपुर सायकल वारी मध्ये सहभागी होऊन वारीचा एक वेगळ्या प्रकारे आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक सायकलीस्ट तर्फे करण्यात आले आहे.

सायकल वारीचा कार्यक्रम

सायकल वारीचा मार्ग नाशिक- सिन्नर- नांदूरशिंगोटे- तळेगाव दिघी- नानज- कोल्हार- राहुरी- अहमदनगर- रुईछत्तीसी- चापडगाव- माहीजळगाव- करमाळा- टेंभूर्णी- पंढरपूर असा असणार आहे. पहिल्या दिवशी म्हणजेच २३ जून रोजी सकाळी ६ वाजता पालखी निघून संध्याकाळपर्यंत अहमदनगर शहरात पोहचणार आहे. नगर शहरात मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी २४ जून रोजी टेंभुर्णी येथे मुक्काम करण्यात येणार आहे. तिसऱ्या दिवशी २५ जून रविवारी सकाळी विठुरायाचे दर्शन घेण्यात येणार आहे.

सायकल वारीची वैशिष्ट्ये

  • खेडलेकर महाराज पटांगणात सायकल रिंगण
  • वय वर्षे ८ पासून 70 वर्षीय वारकरी सहभागी
  • त्र्यंबकेश्वर वरून निघणार मशाल / फडकणार झेंडा
  • मुंबई, पुणे, ठाणे शहरातून येणार सायकल वारकरी
  • सोमवार (१९ जून) पर्यंत करा नोंदणी
  • सदैव तत्पर सेवेत वैद्यकीय व्यवस्था

LEAVE A REPLY

*