पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडा सरकार देणार 2 हजार कोटी : भास्करगिरी महाराज

0

कॅनडाच्या कौन्सील जनरल रिव्ह्ज यांच्या शिष्टमंडळाने केली तिर्थक्षेत्र पाहणी

देवगड फाटा (वार्ताहर)- श्रीक्षेत्र पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडा सरकार कमी व्याजदराने 2 हजार कोटी रुपये देणार असून कॅनडाचे कौन्सील जनरल जॉर्डन रिव्ह्ज व त्यांच्या सहकारी अ‍ॅजेला तारा व अन्य अधिकार्‍यांनी पंढरपूर येथे पाहणी केली असल्याची माहिती श्रीक्षेत्र पंढरपूर देवस्थानचे विश्‍वस्त भास्करगिरी महाराज यांनी दिली.
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे तिर्थक्षेत्र विकास पाहणी व नियोजन बैठक 3 ऑक्टोबर रोजी पार पडली. त्यावेळी आलेल्या कॅनेडियन पाहुण्यांचा भास्करगिरी महाराज यांनी सत्कार केला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अतुल भोसले यांचेसह कॅनडातील अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कौन्सील जनरल रिव्हज़ म्हणाले, पंढरपूर हे महत्वाचे तिर्थक्षेत्र आहे. येथे आमचे ठिकठिकाणी स्वागत झाले. त्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळेल. दरवर्षी मोठ्या संख्येने येणार्‍या भाविकांना येथे सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी कॅनडा सरकार पंढरपूरला स्मार्ट तिर्थक्षेत्र करु इच्छित आहे. त्यासाठी अल्प व्याजदरात टप्प्याटप्प्याने 2 हजार कोटी रुपये दिले जातील.
बैठकीस पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आ. भारत भालके, आ. यशोमती ठाकूर, प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, अ‍ॅड. सुनील चावरे, चंद्रकांत दळवी आदी उपस्थित होते.

देवगडच्या स्वयंसेवकांनी केला पंढरपूर मंदिर परिसर स्वच्छ –  यावेळी श्रीक्षेत्र देवगड परिसरातील श्री समर्थ किसनगिरी बाबा सेवाधारी भक्त मंडळाच्यावतीने 115 महिला व पुरुष स्वयंसेवकांनी दोन दिवस श्रमदान करुन विठ्ठल-रुख्मिनी मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, घाट व इतर परिसरात साफसफाईचे काम करुन परिसर स्वच्छ केला. देवगडच्या या सेवाधारी मंडळाचे पंढरपूरवासीयांनी कौतुक केले.

 

LEAVE A REPLY

*