Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

पंढरपूरजवळ वारकऱ्यांचा टेम्पोचा भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू

Share

पंढरपूर : बेळगावच्या मांडोळी येथील आण हंगरगा गावातील नागरिक पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले असता पंढरपूरजवळ त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात पाच वारकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी (दि.०८) पहाटे चार वाजता सांगोल्या जवळील मांजरी येथे हा अपघात घडला.

दरम्यान आज कार्तिकी एकादशीनिमित्त आज लाखो भाविक पंढरपूरात विठुरायांच्या दर्शनासाठी जातात. राज्याच्या कानाकोप-यातून असंख्य भाविक पंढरपूर येथे दाखल होत असताना बेळगाव येथील वारकरी टेम्पोने पंढरपूर येत असतांना हाअपघात झाला. वारक-यांच्या अपघाताची बातमी कळताच मांडोळी आणि हंगरगा गावात शोककळा पसरली आहे.

अधिक वृत्त असे कि, कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या या वारक-यांचा टेम्पोने समोरून येणा-या ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात पाच वारक-यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींचा आकडा अद्याप समजू शकला नाही. जखमी वारक-यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!