Type to search

Featured सार्वमत

पंचायत समितीवरील वर्चस्व कायम ठेवण्यात पाचपुते यशस्वी

Share

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – एक वर्ष ठरले असताना काठावर बहुमत असल्याने पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम लगड आणि उपसभापती प्रतिभा झिटे यांनी पहिल्या अडीच वर्षातले जवळपास सव्वादोन वर्ष पदे उपभोगता आली. त्यांच्या राजीनाम्यानंतर सभापतिपदी शहाजी हिरवे व उपसभापतिपदी मनीषा कोठारी याच्या निवडीने माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी आपले वर्चस्व कायम राखले. तीन महिन्यांसाठी का होईना संधी मिळाल्यामुळे निवडीनंतर जेसीबी आणि पोकलेनच्या माध्यमातून गुलालाची उधळण करण्यात आली.

सव्वादोन वर्षांपूर्वी पंचायत समितीमध्ये पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सात जागा जिंकल्या. त्यावेळी लगड आणि झिटे यांची निवड करतानाच सव्वा वर्षांसाठी ही संधी असल्याचे ठरले होते. मात्र काही ही संधी वाढत जाऊन ती सव्वादोन वर्षे मिळाली. अनेकदा पदाधिकारी बदलाच्या चर्चा झडल्या, मात्र त्या फक्त चर्चाच राहिल्या.

नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पाचपुते गटाच्या काही पंचायत समिती सदस्यांनी बंडाचे निशाण फडकवले होते. मात्र नेत्यांनी नगरपालिका निवडणुकीनंतर तत्काळ हे बंड थोपवले. बंड थोपवले, मात्र पुन्हा हा विषय अडगळीत पडला. आता आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी लगड व झिटे यांना राजीनामा देण्यास सांगून हिरवे व कोठारी यांना संधी दिली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!