पंचवटीत एकाची डोक्यात दगड घालून हत्या

0

पंचवटी : पंचवटी कारंजा परिसरातील साईबाबा ज्यूस पार्लर दुकानासमोर झोपलेल्या एका इसमाचा मध्यरात्रीच्या सुमारास डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.

फुटपाथवर ही व्यक्ती झोपलेली असतांना अज्ञात व्यक्तीने त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला जागीच ठार केले. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तपासकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मध्यमातून पोलीस गुन्हेगाराचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

*