किरण निकम हत्या प्रकरणातील मुख्य संशयित संतोष उघडे ताब्यात

0
नाशिक |  पंचवटी पेठरोडच्या नवनाथनगरमध्ये किरण निकम हत्या प्रकरणातील मुख्य संशयित संतोष उघडे यास नाशिक शहर पोलिसांनी सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले.

पेठरोड शनिमंदिराच्या मागे नवनाथ नगर येथे रात्री दहाच्या सुमारास किरण निकम खून झाला होता. किरण निकम दुचाकीवरून घरी जात असतांना हा प्रकार घडला होता.

दरम्यान, या खुनातील संशयित  संतोष पगारे, बंडू मुर्तडक आणि अजून एक उघडे नामक संशयिताला त्याच वेळी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

मात्र अनेक दिवसांपासून संतोष उघडे हा संशयित फरार होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्यरात्रीच्या सुमारास सापळा रचून संतोष उघडेला ताब्यात घेण्यात यश आले आहे.

या घटनेचा अधिक तपास नाशिक शहर पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

*