जावयाने केला सासू व साडूच्या मुलाचा खून; पंचवटीतील घटना

0
पंचवटी | पंचवटीतील रामवाडी येथील चौघुले पेट्रोल पंप परिसरात जावयाने सासू आणि साडूच्या आठ वर्षांच्या मुलावर धारदार शस्राने वार करून निर्घुण खून केल्याची प्राथमिक माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त होते आहे.

आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जावई मोतीराम बदादे (रा. गंगाम्हाळुंगी, सध्या रा. रामवाडी) याने सासू मंदाबाई दशरथ खराटे (वय ६०, रा.गांदरवाडी) व इयत्ता तिसरीत शिकत असलेला साडूचा मुलगा नैतिक विश्वास लीलके (वय ८) यास गाडीवरून चौखुले पेट्रोल पंप परिसरातील गोदावरी नदीकाठच्या जंगलात नेले. तेथे त्यांच्यावर धारदार शस्राने वार करून त्यांना ठार केले.

याच वेळी जावयाने सासऱ्याला फोन करून सांगितले की, सासू मंदाबाई आणि साडूचा मुलगा नैतिक या दोघांवर रामवाडी परिसरात लुटमार करून चोरटे त्रास देत आहेत. त्यानंतर सासरे दशरथ सोनू खराटे (वय ६०, रा. गांदरवाडी) यांना याठिकाणी जावयाने बोलावले. त्यांच्यावरही हात आणि डोक्यावर धारदार शस्राने वार केले.

याप्रकरणी, पोलीस तपास सुरु असून या घटनेतील जावई मोतीराम बदादे फरार असून त्याचा पोलीस घेत आहेत.

LEAVE A REPLY

*