Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

बारागावनांदूर गट, सोनई व कोरेगाव गणाची 23 जूनला पोटनिवडणूक

Share

अहमदनगर (प्रतिनिधी)- रायगड, पुणे, अहमदनगर, हिंगोली, वर्धा, भंडारा व गोंदिया या सात जिल्हा परिषदांमधील नऊ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध 16 पंचायत समित्यांमधील 16 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता 23 जून 2019 मतदान; तर 24 जून 2019 रोजी मतमोजणी होईल.

दरम्यान, जि.प. सदस्य शिवाजीराव गाडे यांच्या आकस्मित निधनाने बारागाव नांदूर गटाची जागा रिक्त झाली. नेवासा पंचायत समितीच्या सभापती आणि सोनई गणाच्या सदस्या यांनी राजीनामा दिल्याने या रिक्त जागी ही पोटनिवडणूक होत आहे.
या पोटनिवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 3 ते 8 जून 2019 या कालावधीत स्वीकारली जातील. 5 जून 2019 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. मतदान 23 जून 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.
पोटनिवडणूक होणार्‍या जिल्हा परिषदनिहाय निवडणूक विभाग असे: रायगड- कळंब (ता. कर्जत), पुणे- बावडा-लाखेवाडी (इंदापूर), अहमदनगर- बारागाव नांदूर (राहुरी), हिंगोली- येहळेगाव तु. (कळमनुरी), वर्धा- झडशी (सेलू) व मांडगाव (समुद्रपूर), भंडारा- ब्रम्ही (पवनी) व पालांदपूर (लाखनी) आणि गोंदिया- आसोली (गोंदिया).

पोटनिवडणूक होणार्‍या पंचायत समितीनिहाय निर्वाचक गण असे: पेण (जि. रायगड)- वडखळ, पालघर (पालघर)- खैरापाडा, हवेली (पुणे)- वाडेबोल्लाई, कागल (कोल्हापूर)- माद्याळ, देवळा (नाशिक)- महालपाटणे, चाळीसगाव (जळगाव)- मेहुणबारे, नेवासा (अहमदनगर)- सोनई, कर्जत (अहमदनगर)- कोरेगाव, केज (बीड)- आडस, बिलोली (नांदेड)- अटकळी, माहूर (नांदेड)- वाई बा, मुखेड (नांदेड)- जांब बु., औंढा ना. (हिंगोली)- असोला तर्फे लाख, गोरेगाव (गोंदिया)- घोटी, अर्जुनी मोरगाव (गोंदिया)- माहुरकुडा आणि हिंगणघाट (वर्धा)- वडनेर.

निवडणूक कार्यक्रम – नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 3 ते 8 जून
अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 15 जून
अपील असल्यास उमेदवारी माघार-19 जून
मतदान- 23 जून
मतमोजणी- 24 जून

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!