महापालिका कर्मचाऱ्याचा खून व्याजातून; दोघांना अटक

0

नाशिक : महापालिका कर्मचाऱ्याचा खून व्याजाच्या पैश्यातून झाल्याचे आज उघडकीस झाले आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून मिळते आहे.

पंचवटीतील रामवाडी, कोशिरेमळा परिसरांत नदीकाठावर ३८ वर्षीय मनपा कर्मचार्‍याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मंगळवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात मारेकर्‍यांनी तरुणाची धारधार शस्त्राने भोसकून हत्या केली होती. याप्रकरणी पंचवटी पोलीस आरोपीच्या शोधात होते.

अरुण अशोक बर्वे (वय.३८ रा.स्नेहलपार्क, उद्य कॉलनी) यांची अज्ञात व्यक्तींनी धारधार शस्त्राने भोसकून हत्या झाल्याने आरोपीचा शोध घेणे पोलिसांपुढचे मोठे आवाहन होते. अखेर या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे.

LEAVE A REPLY

*