पत्नीच्या खून प्रकरणी पतीस जन्मठेप

0

नाशिक । दि. 3 प्रतिनिधी
दारूच्या नशेत पत्नीचा गळा आवळून खून केल्याच्या आरोपावरून पंचवटीतील सर्जेराव सोनाजी उन्हाळे यास जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

पंचवटीतील पेठ रोडवरील वडजाईमाता मंदिराजवळ सर्जेराव उन्हाळे (वय 23) पत्नी सीमा हिच्यासह राहत होता. त्यांना अपत्य नव्हते. पती दारू पिवून सीमाला मारहाण करीत असल्याने ती दीड वर्षे माहेरी पुण्याला राहिली होती.

11 जुलै 2015 ला सर्जेरावने रात्री दारूच्या नशेत सोन्याची अंगठी मागण्याच्या कारणावरून सीमा हिचा ओढणीने गळा आवळून खून केल्याचा आरोप होता.

या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकारतर्फे ऍड. विद्या जाधव यांनी पाच साक्षीदार तपासले. वैद्यकीय अधिकारी आणि साक्षीदार रामदास जाधव यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तपास अधिकारी एल. बी. कारंडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

न्यायालयाने खूनाच्या आरोपावरून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपी उन्हाळे अटक झाल्यापासून दोन वर्षे कारागृहात आहे.

LEAVE A REPLY

*