Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पंचवटी : हिरावाडीत पेट्रोल ओतून चारचाकी जाळली; परिसरात खळबळ

Share

पंचवटी | वार्ताहर

पंचवटीतील हिरावाडी परिसरात असलेल्या भगवतीनगर येथे सोमवारी (दि.22) पहाटेच्या सुमारास अज्ञात्यांनी चारचाकी वाहन जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व्यवसाय करणारे दिलीप अंबरपुरे हे भगवतीनगरला राहत असून, रविवारी (दि.२१) रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे टाटा हेक्सा (एमएच १५-जीएफ-८०८९) गुरुकृपा बंगल्याबाहेर उभी केली असताना अज्ञात समाजकंटकांनी पेट्रोल ओतून पेटवून दिली.

काही वेळाने जोराचा आवाज झाल्याने नागरिक जागे झाले, त्यानंतर काहीतरी जळाल्याचे समजताच अंबरपुरे यांनी बंगल्याबाहेर धाव घेतली असता गाडी जळताना दिसली. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती कळविली व नंतर घटनास्थळी पंचवटी अग्निशमन दलाच्या अमृतधाम उपकेंद्र जवानांनी धाव घेत आग विझविली.

भरवस्तीत घडलेल्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे दोन ते तीन दिवसांपूर्वी म्हसरूळ परिसरातील बोरगड वाढणे कॉलनी भागात असलेल्या भास्कर सोसायटीत तीन दुचाकी जाळल्याची घटना उघडकीस आली होती. दरम्यान, आपापसातील वादातून चारचाकी वाहन जाळल्याची संशय व्यक्त होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!