Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

पालखीद्वारे येणार्‍या साईभक्तांकरिता स्वतंत्र पालखी गेट सुरू करण्यात येणार

Share

शिर्डी (प्रतिनिधी) – श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्यावतीने येत्या श्रीरामनवमी उत्सवापासून श्रीसाईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरिता पालखीद्वारे येणार्‍या पदयात्री साईभक्तांकरिता स्वतंत्र पालखी गेट सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली.

डॉ. हावरे म्हणाले, महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या कानाकोपर्‍यातून श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी पालखीद्वारे पदयात्री शिर्डी येथे येत असतात. यामध्ये श्रीरामनवमी, श्रीपुण्यतिथी, श्रीगुरुपौर्णिमा, श्रीदत्तजयंती आदी उत्सवांत पदयात्री पालख्यांव्दारे सहभागी होतात. वर्षभरात सुमारे 650 पालख्यांद्वारे सुमारे 2 लाखांहून अधिक पदयात्री साईभक्त शिर्डी येथे येतात. या येणार्‍या पदयात्रींना श्रींच्या दर्शनाकरिता स्वतंत्र गेट असावे, अशी मागणी संस्थान व्यवस्थापन समितीकडे पालखी पदाधिकार्‍यांकडून वारंवार होत होती. त्यानुसार संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांना पालखीद्वारे येणार्‍या पदयात्रींकरिता स्वतंत्र गेट करता येईल का? अशी विचारणा केली असता, त्यांनी प्रशासकीय शहानिशा करून पालखीद्वारे येणार्‍या पदयात्री साईभक्तांना श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरिता वेगळे पालखी गेट सुरू करता येईल असा अभिप्राय दिला आहे.

पालखीतील पदयात्रींच्या भावनांचा विचार करून व सुरक्षा यंत्रणेच्या अभिप्रायाअंती येत्या श्रीरामनवमी उत्सवापासून श्रीसाईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरिता पालखीव्दारे येणार्‍या पदयात्री साईभक्तांना स्वतंत्र पालखी गेट सुरू करण्यात येणार आहे. याकरिता पालखी प्रमुखांनी पालखी निघण्यापूर्वी संस्थानच्या संरक्षण विभागात नोंदणी करणे गरजेचे असल्याचेही डॉ. हावरे यांनी सांगितले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!