Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रपालघर : डहाणू आणि तलासरी तालुक्यात पुन्हा भुकंपाचे धक्के

पालघर : डहाणू आणि तलासरी तालुक्यात पुन्हा भुकंपाचे धक्के

पालघर : जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात भुकंपाचे धक्के आज पहाटे ५.२२ मिनिटांनी जाणवले आहेत. हे धक्के ३.८ रिश्टर स्केल असल्याचे सांगण्यात आले आहेत. मात्र या प्रकरणी कोणताही अनुसुचित प्रकार घडला नाही. पण परिसरातील घरांना तडे गेले आहेत.

मागील वर्षभरापासून या परिसरात भूकंपाचे धक्के बसत आहेत. तलासरी आणि डहाणू मधील मधील विविध ठिकाणी भुकंपाचे जोरदार धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर भुकंपाचे धक्के बसताच स्थानिकांनी घरातून बाहेर पडत सुरक्षितस्थळी गेले. या प्रकरणी कोणताही जीवितहानी झाली नसल्याचे तहसीलदारांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर वारंवार सुरु असलेल्या भुकंपाच्या सत्रावर लवकरात लवकर उपाय करावा अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

- Advertisement -

यापूर्वी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सकाळी ११ वाजल्याच्या सुमारास पालघर तालुक्यामध्ये सुमारे ४.३ रिश्टल स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. हा धक्का पाच मीटर खोल असल्याची माहिती देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहे. महिन्याभरापूर्वी पालघरमध्ये एका दिवसात 6 भूकंपाचे धक्के बसले होते. यामध्ये सुरक्षेचा उपाय म्हणून घराबाहेर पडताना एका चिमुकलीचा जीव गेला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या