पालघर : जिल्ह्यात पुन्हा ६.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; नागरिक भूकंपाच्या सावटाखाली
Share

पालघर: जिल्ह्यातील काही भागात सकाळी पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. सकाळी सव्वा सहाच्या सुमारास ६. २ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही.
दरम्यान जिल्ह्यात अनेक दिवसांपासून काही कालांतराने भूकंपाचे धक्के बसत आहेत. बुधवारी (दि.२०) रोजी दुपारी १. ३५ मिनिटांनी ४.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. तसेच आज सकाळीसव्वा सातच्या सुमारास डहाणू तालुक्यातील धुंदलवाडीत भूकंपाचे धक्के बसले.
याबाबत मुंबई हवामान खात्याच्या शास्रज्ञ शुभांगी भुते यांनी माहिती दिली. तसेच हे धक्के माध्यम स्वरूपाचे असून गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात ठिकठिकणी भूकंपाचे धक्के बसत असून यामुळे भूकंपाच्या सावटाखाली नागरिक आहेत.