VIDEO : पाकिस्तानी गायिकेने मराठीत गायले प्रेमगीत

0

पाकिस्तानी गायिका नाझिया अमिन मोहम्मद हिने भारतातल्या मराठी रसिकांसाठी तिने खास मराठी भाषेतलं प्रेमगीत गायलं आहे.

’जोगावा’ चित्रपटातलं ‘जीव दंगला रंगला’ हे प्रसिद्ध गाणं तिनं गायलं आहे.

याचा व्हिडिओदेखील नाझियाने आपल्या फेसबुक अकाऊंटवर अपलोड केलाय.

कराचीमध्ये राहत असेल्या नाझियाने बुधवारी रात्री उशिरा हा व्हिडिओ अपलोड केला आहे.

संगीताला कोणत्याही सीमा आणि बंधनं नसतात असं सांगत तिने गाणं गात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केलाय.

काही महिन्यांपूर्वी नाझियाने भारतातल्या मल्याळी भाषिकांसाठी गाणं गायलं होतं. याचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि या व्हिडिओला भारत आणि दुबईमधून तुफान प्रसिद्धी मिळाली होती.

LEAVE A REPLY

*