इस्लमाबाद : तरुणाने घराच्या भिंतीवर ‘हिंदुस्तान जिंदाबाद’ लिहल्याने देशद्रोहाचा गुन्हा दाखल

0

पाकिस्तानमधील  खबर-पख्तूनख्वा प्रांतातील एका तरुणाने घराच्या भिंतीवर ‘हिंदुस्तान जिंदाबाद’ लिहल्याने त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, साजीद शाह असे या तरुणाचं नाव आहे.

नारा अमाजी परिसरात त्याचे घर आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी घरावर छापा टाकत ही कारवाई केली. यावेळी त्याने आपल्या घराच्या भिंतीवर  ‘हिंदुस्तान जिंदाबाद’ लिहिले असल्याचे पोलिसांना आढळले.

साजीद शाहने आपल्या घराच्या बाहेरील बाजूच्या भिंतीवर  ‘हिंदुस्तान जिंदाबाद’ लिहिले अशी माहिती पोलिसांनी दिल्याचं वृत्त डेली एक्स्प्रेसने दिलं आहे.

त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साजिदला सात वर्षांची शिक्षा तसंच दंड ठोठावला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

*