Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वैमानिक आज भारतात परतणार

Share
नवी दिल्ली : भारतीय हवाई हद्दीत घुसून काश्मिरातील लष्करी तळांना लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानच्या एफ-१६ विमानाचा वेध घेणारे हवाई दलाचे वीरयोद्धा विंग कमांडर अभिनंदन वर्तमान आज, गुरुवारी सकाळी मायदेशी परतणार आहेत. शांततेचे आर्जव व चर्चेचे आवाहन करीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी पाक संसदेत केले होते.

संसदेत बोलताना इम्रान खान यांनी शांततेसाठी आपण भारतीय वैमानिकाची सुटका करत असल्याचं सांगितलं. शुक्रवार (दि.१) रोजी दुपारपर्यंत वाघा बॉर्डरच्या मार्गे अभिनंदन भारतात परतणार असल्याची माहिती आहे. अभिनंदन यांची सुटका करत तात्काळ भारतात पाठवण्यात यावं अशी मागणी भारताकडून कऱण्यात आली होती. कोणतीही चर्चा न करता पाकिस्तानने आमच्या वैमानिकाला भारतामध्ये पाठवावे अशी कठोर भूमिका भारताने घेतली होती.

संसदेच्या संयुक्त अधिवेशनात पंतप्रधान खान यांनी, ‘भारताशी चर्चा सुरू होण्याचे पहिले पाऊल म्हणून पाकिस्तान शुक्रवारी अभिनंदन यांची सुटका करील’, अशी घोषणा केली व सभागृहातील पाक खासदारांनी या घोषणेचे बाके वाजवून स्वागत केले.

….. अभिनंदन पोहचले पाकव्याप्त भूमीत
भारतीय हद्दीत शिरलेल्या २४ विमानांच्या ताफ्याचा काश्मिरातील नौशेरा व राजौरी क्षेत्रातील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा कट बुधवारी हवाई दलाने उधळून लावला. ‘मिग २१ बायसन’ विमानाचे सारथ्य करणाऱ्या अभिनंदन यांनी पाकच्या ‘एफ १६’ विमानाचा वेध घेत जमीनदोस्त केले. मात्र, त्याचवेळी त्यांचे विमानही अपघातग्रस्त झाले. विमान कोसळण्यापूर्वी अभिनंदन यांनी पॅराशूटद्वारे विमानाबाहेर झेप घेतली, मात्र ते पाकच्या भूभागात पोहोचल्याने त्यांना तेथील सैनिकांनी ताब्यात घेतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!