पाकिस्तान : कृषी विद्यापीठावर दहशतवादी हल्ला

0

शुक्रवारी पेशावर येथे कृषी विद्यापीठातील मुलांच्या हॉस्टेलवर दहशतवाद्यांनी हल्ला केला.

या हल्ल्यात 11 जणांचा मृत्य़ू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत.

पाकिस्तानमधील सुरक्षा दलांनी हल्ला करणाऱ्या पाचही दहशतवाद्यांना ठार मारले.

पेशावरमधील कृषी विद्यापीठाच्या जवळ मुलांचे हॉस्टेल आहे. या हॉस्टेलवर शुक्रवारी पाच आत्मघाती दहशतवाद्यांनी हल्ला केला. गोळीबाराचा आवाज ऐकून काही विद्यार्थ्यांनी हॉस्टेल बाहेर पळ काढला. हल्ल्याचे वृत्त समजताच पोलीस आणि सैन्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

हॉस्टेलमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. या घटनेत 30 जण जखमी झाले असून यात सुरक्षा दलातील सैनिकांचाही समावेश आहे. 11 जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*