Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पत्नीचे निधन

Share

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पत्नी बेगम कुलसूम शरीफ (68) यांचे लंडन येथील हार्ले स्ट्रीट क्लिनिकमध्ये घशाच्या कॅन्सरने निधन झाले. दरम्यान, भ्रष्टाचाराच्या आरोपावरून रावळपिंडीच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले नवाझ शरीफ, मुलगी मरयम आणि जावई मुहम्मद सफदर यांना अंत्यसंस्कारास उपस्थित राहता यावे यासाठी त्यांना सरकारने पॅरोल मंजूर केला आहे. कुलसूम यांचे पार्थिव पाकिस्तानात आणण्याचा निर्णय शरीफ कुटुंबीयांनी घेतला आहे. लाहोरजवळील वारयविंद येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

कुलसूम यांच्यावर हार्ले स्ट्रीट क्लिनिकमध्ये 2014 पासून उपचार सुरू होते. फुप्फुसाचा त्यांचा आजार बळावल्याने त्यांना जूनपासूनच व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!