Type to search

मसूद अझहरच्या मालमत्ता जप्तीचे पाकचे आदेश

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

मसूद अझहरच्या मालमत्ता जप्तीचे पाकचे आदेश

Share

वृत्तसंस्था | ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अजहरला संयुक्त राष्ट्र सरकारने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. यानंतर पाकने कारवाईचे पहिले पाऊल ताकत मसूद अझहरची संपत्त्तीच्या जप्तीचे आदेश दिले आहेत. यासोबतच त्याच्या प्रवासावरही बंदी घालण्यात आल्याचे वृत्त आहे.

पाकिस्तानातील इम्रान खान सरकारने आज तशी अधिसूचना काढत मसूदवर आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याचे सांगण्यात आले आहे.

भारतासह अनेक देशांमधील दहशतवादी कारवायांमध्ये मसूदचा हात असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. यामुळे त्यास आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचे प्रयत्न जागतिक पातळीवर सुरू होते.

भारताने याकामी पुढाकार घेतलेला होता. भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देत अमेरिका व फ्रान्सनेही संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मसूदवर बंदीचा प्रस्ताव आणला होता.

सुरुवातीला या प्रस्तावास विरोध करणाऱ्या चीननं श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांनंतर भूमिका बदलली आणि मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!