इम्रान खानच्या शपथविधीचं निमंत्रण नवज्योत सिंग सिद्धूने स्विकारलं

0
 नवी दिल्लीपंजाबचे कॅबिनेट मंत्री व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू हे इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानात जाणार आहे. एकीकडे पाकिस्तानाकडून सतत सीमाभागात हल्ले होत असताना सिद्धू हे पाकिस्तानात जात असल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.
इम्रान खान यांनी शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, कपिल देव आणि सिनेस्टार अमिर खान यांनाही निमंत्रण दिले आहे. ‘हा माझ्यासाठी बहुमान’ असल्याची प्रतिक्रिया सिद्धू यांनी दिली आहे. अनेक अडथळे पार पाडत इम्रान खान हे पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. एका खेळाडूने राजकारणात उच्चस्थान प्राप्त केल्याने आपण या शपथविधीला जाणार असल्याची माहिती सिद्धू यांनी दिली आहे.
या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही. मोदींना निमंत्रित करण्याची शक्यता असून, पीटीआय पक्ष पाकिस्तानातील परराष्ट्रीय विभागाशी चर्चा करीत आहे, असे सुत्राने सांगितले आहे. शिवाय, सार्क परिषदेच्या प्रतिनिधी देशांनाही अमंत्रित करण्यात येणार आहे, असे पक्षाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*