पाकिस्तान : हाफिज सईद निवडणूक लढवणार

0

आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफिज सईद पाकिस्तानमधील आगामी सार्वत्रिक निवडणूक लढवणार असल्याचे समजते.

पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यावेळी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरू, असे हाफिज सईदने सांगितले.

लाहोर उच्च न्यायालयाने हाफिजची नजरकैदेतून सुटका करण्याचे आदेश दिल्यानंतर हाफिजने याबद्दलचे संकेत दिले होते. ही अटकळ आता खरी ठरण्याची शक्यता आहे. मात्र, आपण कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार, याबद्दल हाफिजने अजून कोणतीही माहिती दिलेली नाही.

 

LEAVE A REPLY

*