सीमेवरील सैनिकांच्या बलिदानाचा बदला घेणार; पाकिस्तान लष्करप्रमुखांची धमकी

0
इस्‍लामाबाद : पाकिस्‍तानमध्ये इमरान खान यांच्या नव्‍या नेतृत्‍वाबदलानंतर भारत आणि पाकिस्‍तान यांचे संबंध सुधारतील असे वाटत असतानाच पाकच्या सेनाप्रमुखांनी वादग्रस्‍त वक्‍तव्‍य करून त्याच्यावर पाणी सोडलं आहे. पाकिस्‍तानचे प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी पुन्‍हा एकदा काश्मीरचा राग अळवला आहे. त्यांनी यावेळी स्‍वातंत्र्याबाबत आम्‍ही काश्मीरच्या सोबत राहणार आहे. काश्मीरसाठी शहीद झालेल्यांना आम्‍ही सलाम करतो आणि त्यांच्या प्रत्येक रक्‍ताच्या थेंबाचा हिशोब चुकता करणार असल्याचे वादग्रस्‍त वक्‍तव्‍य त्यांनी केले आहे. पाकस्‍तानच्या लष्कर प्रमुखांनी ही गरळ ओकल्‍याने पाक-भारत संबंध पुन्‍हा चर्चेचा विषय ठरला आहे.

जगभरात दहशतवादी कारवाया वाढत गेल्या आणि याचा फटका पाकिस्तानलाही बसला. देशात दहशतवादी हल्ले झाले, देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला. यात हजारो सैनिकांचे प्राण गेले आणि जखमी झाले. या सर्वांच्या बलिदानाला पाकिस्तान कधीच विसरु शकणार नाही, असे त्यांनी सांगितले. सीमेवर बलिदान देणाऱ्या जवानांचे रक्त आम्ही वाया जाऊ देणार नाही. याचा बदला घेऊ, असे त्यांनी सांगितले. सैन्याचे काम अजून संपलेले नाही. युद्ध अजूनही सुरुच आहे.

LEAVE A REPLY

*