Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशपाकिस्तानचे शेकडो कोरोनाग्रस्त दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत

पाकिस्तानचे शेकडो कोरोनाग्रस्त दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत

 सार्वमत 

नवी दिल्ली – दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या शेकडो दहशतवाद्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, या अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारकडे उपचारासाठी मदत मागितली. मात्र, सरकारने उपचार करण्यास नकार दिला असल्याने, यातील बहुतांश दहशतवादी काश्मीरला परतण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी धक्कादायक माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मू-काश्मीरसह गुजरात आणि राजस्थानलाही सतर्कतेचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, शाहिद या लाहोरमधील अतिरेक्याने अनंतनागमध्ये राहणार्‍या त्याच्या कुटुंबातील लोकांना दूरध्वनी करून सांगितले की, त्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्याची तब्येत इतकी खालावली आहे की, कदाचित हा त्याचा अखेरचा फोन असेल. त्याचा हा फोन गुप्तचर यंत्रणांनी टॅप केला आणि त्यांच्यातील संभाषण ऐकले. माझ्यासोबत माझ्या अनेक साथीदारांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचेही त्याने आपल्या कुटुंबीयांना कळविल्याचे गुप्तचर सूत्रांनी सांगितले.

आतापर्यंत पाकिस्तान सरकार, लष्कर आणि आयएसआयच्या इशार्‍यावर कोणत्याही भारतविरोध कारवाईसाठी आम्ही स्वत:ला झोकून दिले आहे. आमच्यापैकी अनेकांचा यात मृत्यूही झाला आहे. मात्र, आज आमचा जीव संकटात आहे. आम्हाला कोरोनाने ग्रासलेअसून, आम्ही मृत्युच्या अतिशय जवळ आहोत. आमच्यावर तातडीने उपचार करा, आम्हाला वाचवा, अशा विनवण्या शेकडो अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला केल्या आहेत, पण सरकारने उपचारास स्पष्ट नकार दिला. आता फक्त भारतच आपला जीव वाचवू शकतो, असे यातील अनेकांचे ठाम मत झाले असल्याने, त्यांनी काश्मीरमध्ये प्रवेश करण्याची तयारी सुरू केली असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या