पाईपलाईन रस्त्यावर दवाखान्यात भरदिवसा चोरी

0
नगर टाइम्स,

अहमदनगर (प्रतिनिधी) – चोरट्यांनी आता आपला मोर्चा डॉक्टरांच्या गल्ल्याकडे वळविला आहे. सावेडीतील पाईपलाईन रस्त्यावरील डॉ. शिंदे यांच्या दवाखान्यात भरदिवसा चोरी झाल्याची घटना काल समोर आली.

डॉ. महेंद्र विठ्ठलराव शिंदे यांच्या श्रीनाथ माऊली आयुर्वेद दवाखान्यात शुक्रवारी (दि.8) झालेल्या चोरी प्रकरणी काल बुधवारी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. डॉ. शिंदे हे क्लिनीकच्या दरवाजाला कुलूप लावून बाहेर कामासाठी गेले होते. दोन अज्ञात चोरट्यांनी केबीनचे दार तोडून आत प्रवेश केला. टेबलच्या ड्रॉवरमधील 13 हजार 500 रूपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. काम अटोपून डॉ. शिंदे हे सायंकाळी क्लिनीकमध्ये आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. शिंदे यांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव धेत अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोना.व्ही.डी.गाजरे करत आहे.

 

LEAVE A REPLY

*