चित्रकार प्रफुल्ल सावंत यांचा फ्रान्समध्ये सन्मान

0
नाशिक | येथील प्रसिध्द चित्रकार प्रफुल्ल सावंत यांना जगातील सर्वोत्तम चित्रकाराचे प्रथम पारितोषिक फ्रान्समधील एका सोहळ्यात प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार प्रिक्स ड्यू कौन्सिल डिपार्टमेंट ऑफ फ्रान्स या शासकीय विभागातर्फे देण्यात आला. 500 युरो व प्रमाणपत्र असे त्याचे स्वरूप आहे.

फ्रान्सच्या डिपार्टमेंट ऑफ कौन्सिलचे अध्यक्ष पीरे सीमानी याच्या हस्ते फ्रान्स इग्विलून इंटरनॅशनल वॉटर कलर फेस्टिवलच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सावंत यांनी पुरस्कार स्वीकारला. फ्रान्समधील जागतिक आर्ट फेस्टिवलसाठी पंधरा देशातील निवडक 5 चित्रकारांना निमंत्रित करण्यात आले होते.

भारतातून केवळ प्रफुल्ल सावंत यांना निमंत्रण होते. सर्व चित्रांचे परिक्षण फ्रान्सच्या ज्येष्ठ चित्रकारांच्या मंडळाने केले. सावंत यांनी विविध देशांतील सौंदर्यस्थळांवर आधारित निसर्गचित्रे सादर केली होती. मंडळाने सावंत यांच्या कलाकृतीवर शिक्कामोर्तब केले.

LEAVE A REPLY

*