Type to search

Breaking News जळगाव

पहूर येथील तरूणाचा वाघूर नदीत बुडून मृत्यू

Share

पहुर ता जामनेर (वार्ताहर ) –

जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथील रहिवासी शेख शाहरुख शेख आयुब खाटीक (वय 27) हा तरुण आज दि.२१ रोजी सकाळी वाघूर नदीवरील डोहामध्ये त्याचा पाय घसरून पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शाहरुख शेख आयुब खाटीक याला पोहता येत नसल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याठिकाणी उपस्थित असलेले केतन जाधव व संजय बाविस्कर या तरुणांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता या दोघांना शेख शाहरुख शेख आयुब खाटीक दहा ते पंधरा मिनिटं तो सापडला नसल्यामुळे नदीमध्ये पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे खाली तळाशी दबल्यामुळे या दोघा तरुणांना दहा ते पंधरा मिनिटं दिसला नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असून त्याला यातून बाहेर काढून येथील ग्रामीण रुग्णालय उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टर संदीप कुमावत यांनी त्याची तपासणी केली असता त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्याने व डोक्याला मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

शेख शाहरुख खाटीक हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे पश्चात आई, वडील, पत्नी, एक वर्षाची मुलगी असा परिवार आहे. त्याचेवर पहूर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पहूर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पहूर पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अनिल अहिरे, पोलीस नाईक किरण शिंपी, पो.काँ.जितुसिंग परदेशी हे करीत आहे. पो.काँ.अनिल देवरे, ईश्वर देशमुख, होम.राजु देशमुख व दिपक सावळे हे करीत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!