पद्मावती वाद : मी 200% सिनेमा आणि भंसाळींच्या बाजुने : रणवीर सिंह

0

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती सिनेमाच्या वादावर अलाउद्दीन खिल्जीची व्यक्तिरेखा साकारलेल्या रणवीर सिंगने आपले मत मांडले आहे.

पद्मावतीशी निगडीत वादात तो 200 टक्के सिनेमाच्या आणि दिग्दर्शकाच्या बाजूने असल्याचे रणवीर सिंग म्हणाला.

पद्मावती सिनेमावर सुरू असलेल्या वादाबद्दल त्याला प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, हा फार संवेदनशील विषय आहे. यावर मला काहीही बोलण्याची मनाई केली आहे.

या विषयावर जो काही निर्णय होईल तो सिनेमाच्या निर्मात्यांकडून तुम्हाला सांगण्यात येईल.

LEAVE A REPLY

*