Type to search

Breaking News आवर्जून वाचाच गणेशोत्सव जळगाव

श्रीक्षेत्र पद्मालय व तरसोद येथे अंगारकी चतुर्थी निमित्त यात्रोत्सव

Share

एरंडोल / तरसोद –

उद्या दि.17 सप्टेंबर रोजी अंगारकी चतुर्थी निमित्त श्रीक्षेत्र पद्मालय व तरसोद येथे यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी तीन अंगारिका चतुर्थीचा योग होता. मात्र यावर्षी दि.17 सप्टेंबर रोजी एकच अंगारिका असल्यामुळे भाविकांनी यात्रोत्सवाला मोठ्या संख्येने हजेरी लावून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पद्मालय व तरसोद येथील मंदिर विश्वस्थ मंडळाने केले आहे.

एस.टी.बसेसची सुविधा

मंगळवारी पहाटेपासून भाविकांच्या सोयीसाठी जळगाव एस.टी.आगार तर्फे पद्मालय व तरसोद साठी खास एस.टी.बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. …….

उजव्या व डाव्या सोंडेचा गणपती

सध्या पावसाळा सुरू असल्याने पद्मालय परिसरात निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे. अशा सृष्टी सौंदर्याने नटलेल्या व एकाच मंदिरात डाव्या व उजव्या सोंडेच्या गणपतीचे दर्शन घेण्याचा अलभ्यलाभ भाविकांना घेता येणार आहे.

जागृत देवस्थान

तर जळगाव शहरापासून जवळच असलेल्या व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जागृतस्थान असलेल्या श्रीक्षेत्र तरसोद येथील श्रीगणेशाचे दर्शन भाविकांनी घ्यावे असे आवाहन मंदिर संस्थानने केले आहे. या दोनही ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध केल्या असून सध्या पावसाचे दिवस असल्याने पावसापासून संरक्षण व्हावे यासाठीही विशेष सोय करण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!