Type to search

जळगाव

आदित्य ठाकरे यांनी पाचोरा भडगाव-मतदार संघात साधला पहिला जनसंवाद

Share

पाचोरा – शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्रव्यापी जनआशीर्वाद यात्रेचा भव्यदिव्य शुभारंभ १८ जुलै रोजी जळगाव जिल्ह्यात पाचोरा भडगावं मतदार संघातुन होत आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे जळगाव जिल्हा व खान्देशमध्ये भगवे चैतन्य पसरले आहे. पाचोरा,भडगावं मतदारसंघासह जळगाव ग्रामीण-धरणगाव,एरंडोल, चोपडा व अमळनेर या पाच विधानसभा क्षेत्रांत जनआशीर्वाद यात्रा जाणार असून आदित्य ठाकरे यांनी पहिला संवाद आ किशोर पाटील यांच्या मतदारसंघात केला आहे या जनआशीर्वाद यात्राच्या संवादात लोकसभा निवडणुकीत ज्यांनी मते दिली त्यांचे आभार मानायचे तर त्याचे आभार मानलेच पण ज्यांनी मते दिली नाहीत त्यांची मने जिंकायचा पहीला विजय पाचोरा भडगावं मतदारसंघात आ किशोर पाटील यांचा प्रयत्नातून यशस्वी झाला होता तो, विश्वास व्यक्त करत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा आज पाचोऱ्यात धूम धडाक्यात सुरू झाली होती ते आहे.

 

ज्यांनी मते दिली त्यांचे आभार मानायचे आहेत आणि ज्यांनी नाही दिले, त्यांची मने जिंकायची आहेत असा विश्वास व्यक्त शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. जनसंवाद यात्रेचा शुभारंभ आज गुरुवारी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथून सुरुवात झाली आहे.

 

पाचोरा येथील छत्रपती संभाजी महाराज चौक, लक्ष्मीनगर याठिकाणी भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या जाहीर सभेच्या व्यासपीठवर दौऱ्यात आलेले शिवसेना नेते, खासदार संजय राऊत,पर्यावरणमंत्री रामदास कद सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उपनेते, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, संपर्कप्रमुख विलास पारकर व संजय सावंत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी सहभागी होते .

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!