Type to search

जळगाव फिचर्स

बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाचा बुडून मृत्यू

Share

पाचोर/नांद्रा  –

बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. लग्नाची तारीख जवळ येत होती. घरात लग्नाची धावपळ सुरु होती. परंतु, दुसरीकडे गिरणा नदीच्या वाहत्या पाण्यात बुडून भावी नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कुरंगी येथे घडली.

पाचोरा तालुक्यातील कुरंगी गावातील शेतमजूरी करणारा रमेश झगा पाटील (वय 27) हा दि.11 रोजी 4.45 वाजेच्या सुमारास गिरणा नदीवर दोघ बहीणींसह घरातील झावरी धुण्यासाठी आला होता. यावेळी रमेशचा अचानक पाय घसरून पडल्याने नदीच्या वाहत्या पाण्यात मृत्यू झाला.

मयत रमेश याचा दि.18 फेब्रुवारी रोजी पद्मालय देवस्थान येथे नियोजित विवाह होणार होता. त्याची नववधू पुणे येथील होती. दोन्ही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू असतांनाच ही दुर्दैवी घटना घडली. विवाहापूर्वी अचानक रमेशच्या मृत्यूची बातमी घरच्यांना आणि परिसरात मिळताच शोककळा पसरली.

त्याचा मृतदेह पाचोरा येथे ग्रामीण रुग्णालय आणण्यात आला. त्याच्या पश्चात आई, दोन बहिणी, दोन भाऊ असा परीवार आहे. अंत्यत प्रतिकुल परीस्थितीत त्यांचे कुटुंब उदरनिर्वाह करीत आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे शासनाने त्वरित नैसर्गिक आपत्तीतुन मदत करावी अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!