नगर टाइम्स इफेक्ट : दिल्लीगेटची नाककोंडी फुटली

0

मनपाकडून ड्रेनेज लाईनची दुरुस्ती

अहमदनगर (प्रतिनिधी) – दिल्लीगेट परिसरातील फुटलेली सिमेंटची ड्रेनेज लाईन दुरुस्त करण्यात आली आहे. तेथे नवीन लाईन टाकण्यात आली आहे. तीन ते चार दिवसांपासून हे काम सुरू होते. ‘नगर टाइम्स’ने बुधवार (दि. 10 मे) च्या अकांत ‘फुटक्या ड्रेनेजचा वास दिल्ली गेटच्या नाकातोंडात’ या मथळ्याखाली विशेष वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत महापालिकेने लगेच काम सुरू केले.

मागील काही दिवसा मध्ये दिल्ली गेट परिसरातील रस्त्याच्या बाजूला असणारी ड्रेनेज पाईप लाईन फुटल्याने ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर साचले जात होते. तसेच मोठ्या प्रमाणात हे पाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहत होते. त्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी व आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. ही ड्रेनेज पाईप लाईन मनपास दुरूस्त करण्यासाठी आठ ते दहा दिवसापासून वेळ मिळत नव्हता. ज्या ठिकाणी हि पाईप लाईन फुटली असून पाणी रस्त्यावर वाहत होते, त्याच्या जवळ भाजपाचे उपमहापौर यांचे कार्यालय आहे. मात्र या समस्येवर दैनिक नगर टाइम्सने प्रकाश टाकला होता. मनपाने सदर वृत्ताची दखल घेत रात्रीतून हा रस्ता खेदून त्या ठिकाणी सिमेंटचे पाईप लाईन टाकून तेथील ड्रेनेज लाईन दुरूस्त केली.

दिल्ली गेट परिसरातील या समस्या आपल्यशा दैनिकांतून मांडल्या बद्दल परिसरातील नागरिकांनी नगर टाइम्सला धन्यवाद दिले

LEAVE A REPLY

*