पु. ना. गाडगीळ आणि सन्सचा ‘मंगळसूत्र महोत्सव’; १० ते ३० टक्के सुट

मंगळसूत्रासोबतच्या हिऱ्याच्या पेंडंटवर मजुरीत 100 टक्के सूट

0

पुणे | ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.’ने मंगळसूत्र महोत्सव आयोजित केला आहे. नऊ सप्टेंबरपर्यंत सुरू असलेल्या या महोत्सवात मंगळसूत्राच्या मजुरीवर 10 ते 30 टक्के व मंगळूसूत्रासोबतच्या हिऱ्याच्या पेंडंटवर मजुरीत 100 टक्के सूट आहे. फॅन्सी, ट्रेंडी, अँटिक, टेम्पल ज्वेलरी, लाइट वेट मंगळसूत्रांची; तसेच हिऱ्याच्या पेंडंट वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.

श्रावण हा भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मास असल्याने याच काळात पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.ने मंगळसूत्र महोत्सव आयोजित केला असून मंगळसूत्र मजुरीवर सवलत दिली असल्याचे कंपनीचे संचालक-सीईओ अमित मोडक यांनी सांगितले.

पुण्यातील पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.च्या हॅपी कॉलनी-कोथरूड, चिंचवड, औंध, सिंहगड रोड, सातारा रोड आणि भोसरीबरोबर अमरावती, बीड, नाशिक, नाशिक रोड, नारायणगाव, नंदूरबार, पंढरपूर, सोलापूर,  सातारा, संगमनेर,  शिरूर, धुळे, कलबुर्गी (कर्नाटक), प्रभादेवी-मुंबई,  वडोदरा (गुजरात), जळगाव, वर्धा, परभणी व उस्मानाबाद येथील दालनांत मंगळसूत्र महोत्सवाचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.

LEAVE A REPLY

*